नाशिक शहरातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एल-निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वतयारीअंतर्गत रामकुंड परिसरातील विकासकामांना वेग देण्यासाठी १६ मे ते १६ जुलै दरम्यान नागरिक आणि वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी लागू केली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या विविध विकासकामांमुळे ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिकेकडून ८.०५% कूपन दरासह ग्रीन म्युनिसिपल बाँड जाहीर करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनी बांधकाम आणि सिंहस्थ कुंभपर्वासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या बाँडमधून निधी उभारला जाणार आहे.
नवीन नाशिक येथील दादासाहेब फाळके स्मारक परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे वेस्ट टू वंडर पार्क २१ जानेवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या कालावधीत सर्वांसाठी बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार नागरिक आणि पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार हे निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पक्षात महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे.
नाशिक महानगरपालिकेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री यांनी आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश दिले.
अमृत-2 योजनेंतर्गत नाशिकमध्ये नवीन ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. निधीअभावी मनपाने केलेल्या विनंतीनंतर वर्ल्ड बँकेने ७० कोटी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.