नाशिकमध्ये २२–२३ जानेवारीला भव्य ‘सूर्यकिरण’ एअर शो; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक शहरात २२ व २३ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा ‘सूर्यकिरण’ एअर शो आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सप्तशृंगी गड घाटमार्गावर दोन महिने एकेरी वाहतूक लागू

नांदुरी ते सप्तशृंगी गड या घाटमार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने दोन्ही दिशांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे.

नाशिक मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष सुरू; नागरिकांना तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आवाहन

नाशिक महापालिकेने निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू केला असून नागरिकांना सोशल मीडिया, ई-मेल व फोनद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात एईडी मशिन कार्यान्वित; नाशिक ‘हार्ट सेफ सिटी’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीवर ४ नवीन घाट; २६७ कोटींच्या कामांना मंजुरी

सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर चार नवीन घाट बांधले जाणार असून यासाठी २६७ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

नाशिकमध्ये नैसर्गिक शेती संवाद : शाश्वत शेतीसाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मार्गदर्शन

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे झालेल्या नैसर्गिक शेती संवाद कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.

नवीन वर्ष २०२६ची भक्तिमय सुरुवात : नाशिकच्या मंदिरांमध्ये व पर्यटनस्थळांवर भाविकांची विक्रमी गर्दी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहर भक्ती, पर्यटन आणि उत्सवाच्या वातावरणात रंगले. मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या तर पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली.

नाशिक मनपा निवडणूक तयारीला वेग, आचारसंहिता उल्लंघनावर कठोर कारवाई — आयुक्त मनीषा खत्री

नाशिक महानगरपालिकेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेण्यात आली. आयुक्त मनीषा खत्री यांनी आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश दिले.

तपोवन वृक्ष आंदोलनात अचानक शांतता, २७ दिवसांनंतर अल्प उपस्थिती

नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन आंदोलनाला २७ दिवस पूर्ण झाले असतानाही सोमवारी आंदोलनस्थळी अनपेक्षित शांतता दिसून आली. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर अचानक कमी उपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २८ स्मार्ट पार्किंगची तयारी; तीन संस्थांचे अर्ज

नाशिक महापालिकेच्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पात आता गती आली असून २८ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी तीन संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत.