नाशिकमधील पंचवटी येथे काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा आज पार पडणार असून, सायंकाळी रामकुंडावर गोदावरी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक व औद्योगिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे एईडी मशिन कार्यान्वित करण्यात आले असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी ही जीवनरक्षक सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.