नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामानंतर रस्ते व्यवस्थित न केल्याने वाहनधारकांना खडबडीत मार्गावरून प्रवास करावा लागत असून अनेक ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये गळतीची समस्याही वाढली आहे.