नाशिकमध्ये नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणारा तरुण अटकेत; ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हेशाखा युनिट २ ने अटक केली असून ६६ गट्टू व ७ चक्री असा सुमारे ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपोवन वृक्ष आंदोलनात अचानक शांतता, २७ दिवसांनंतर अल्प उपस्थिती

नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन आंदोलनाला २७ दिवस पूर्ण झाले असतानाही सोमवारी आंदोलनस्थळी अनपेक्षित शांतता दिसून आली. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर अचानक कमी उपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सिंहस्थासाठी साधुग्राममधील झाडतोड अपरिहार्य, बदल्यात १५ हजार झाडांची लागवड – मंत्री गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साधुग्राम परिसरातील झाडतोड अपरिहार्य असून, त्याऐवजी १५ हजार झाडांची लागवड केली जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

नाशिक सह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; मतदान 15 जानेवारीला, निकाल 16 रोजी

नाशिक सह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

डिसेंबरमधील धान्यसाठा उशिराने; जिल्ह्यातील ४०० दुकानांचे वितरण ठप्प होण्याची शक्यता

डिसेंबर महिन्याचा धान्यसाठा न मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४०० दुकानदारांचे धान्यवाटप अडथळ्यात आले आहे. वाहतुकीत झालेल्या उशिरामुळे कार्डधारकांनाही मोठी गैरसोय होत आहे.

नाशिकमध्ये फर्जी लोन कॉल सेंटरवर सायबर पोलीसांची धडक कारवाई; एक जेरबंद, एक फरार

नाशिक शहर सायबर पोलीसांनी फर्जी लोन कॉल सेंटर चालवून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे.

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला, तीन दिवसांत तापमानात ४.३ अंशांची घसरण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा कडाक्याची थंडी परतली असून तीन दिवसांत किमान तापमानात ४.३ अंशांची लक्षणीय घसरण झाली आहे.

नाशिकमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २८ स्मार्ट पार्किंगची तयारी; तीन संस्थांचे अर्ज

नाशिक महापालिकेच्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पात आता गती आली असून २८ ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी तीन संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत.

के.के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय ‘प्र-ज्ञान’ विज्ञान प्रदर्शन ११-१२ डिसेंबरला

नाशिकच्या के.के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये ११ आणि १२ डिसेंबरला ‘प्र-ज्ञान’ या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन असून, राज्यातील ७५० विद्यार्थी व २०० प्रकल्प यात सहभागी होणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा 2027: भाविकांसाठी तात्काळ आरोग्यसेवेचे मजबूत नियोजन

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना त्वरित आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे.