नाशिकमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; जून-जुलैमध्ये दर शनिवारी पाणीकपात, ऑगस्टमध्ये आणखी कठोर निर्णयाची शक्यता जून 17, 2026 by nashikinfo.in नाशिक शहरातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एल-निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.