त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील विकासकामांना वेग देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित केला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अमृत-2 योजनेंतर्गत नाशिकमध्ये नवीन ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. निधीअभावी मनपाने केलेल्या विनंतीनंतर वर्ल्ड बँकेने ७० कोटी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.