स्थानिक शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ भव्य पद्धतीने राबवा – शिक्षणमंत्री दादा भुसे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आकर्षक ‘शाळा प्रवेशोत्सव’ राबवण्याचे निर्देश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित सुविधा आणि आधुनिक उपक्रमांवर त्यांनी भर दिला.