नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा शुभारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंड येथे धर्मध्वजारोहण
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक सोहळ्याने सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नाशिकच्या रामकुंडावर धर्मध्वजारोहण करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.