नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही … Read more
नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी: पाच वर्षांपासून बेपत्ता असलेली नाबालिग मुलगी जळगावातून सुरक्षित शोधून काढली
नाशिक शहर पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. पाच वर्षांपासून अपहृत आणि बेपत्ता असलेली नाबालिग मुलगी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुरक्षितपणे शोधून काढली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अपहरण झालेल्या मुला–मुलींचा तसेच मिसिंग महिलांचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे विशेष जबाबदारी देण्यात … Read more
तापमानात मोठी घसरण होण्याचा हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला … Read more
नाशिक जिल्ह्यातील 7 प्रभागांची निवडणूक स्थगित; न्यायालयीन अपील आणि तांत्रिक त्रुटींमुळे आयोगाचा निर्णय
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांना मोठा कलाटणी देणारा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन अपीलांसोबतच नामांकनपत्र भरताना वेळमर्यादेचे पालन न झाल्याने सिन्नर, ओझर आणि चांदवड या तीन नगरपरिषदांच्या एकूण सात प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये सिन्नर नगरपरिषद — प्रभाग क्रमांक 2, 4, 5 आणि 10,ओझर नगरपरिषद — … Read more
नाशिक हवामान अंदाज: २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर – कोरडे वातावरण, तापमानात किंचित घट; पिके व पशुपालनासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
नाशिक जिल्हा हवामान अंदाज: २९ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२४ भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. वातावरण कोरडे राहील व पावसाची कोणतीही शक्यता नाही.तापमानाच्या दृष्टीने कमाल तापमान २८–२९°C तर किमान तापमान १५–१८°C दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ६–१० किमी/तास अपेक्षित आहे. … Read more
नाशिक कुंभमेळा 2027 : साधुग्राम रचनेत बदलाची शक्यता; वृक्षतोडीविरोधातील आंदोलनानंतर पालिकेची माघार
आगामी नाशिक कुंभमेळा 2027 च्या नियोजनात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या साधुग्राम क्षेत्रातील रचना आणि तयारी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. साधुग्राम परिसरात कुंभमेळा नियोजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले होते. या जनक्षोभानंतर नाशिक महानगरपालिकेने तात्पुरती माघार घेत साधुग्राम रचनेत बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. … Read more
आयमा इंडेक्स 2025 औद्योगिक महाकुंभाचे आज भव्य उद्घाटन; 350 स्टॉल्स, ड्रोन शो आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आकर्षण
नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयमा इंडेक्स 2025 या चार दिवसीय भव्य औद्योगिक महाकुंभाचे आज, 28 नोव्हेंबर रोजी उद्घाटन होत आहे. आयमा इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे आयोजित या औद्योगिक महोत्सवाला उद्योग क्षेत्राकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचे चेअरमन वरुण तलवार आणि अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योजक आणि नागरिकांनी वाढत्या संख्येने उपस्थित राहून या मेगा एक्स्पोला … Read more