माघ शुद्ध चतुर्थीला साजरी होणारी माघी श्री गणेश जयंती ही गणपतीच्या जन्मदिनाचे प्रतीक मानली जाते. या दिवशी गणेशतत्त्व सहस्रपटीने कार्यरत असल्याने उपासना, नामजप व पूजेला विशेष महत्त्व आहे.
नाशिक शहरात २२ व २३ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा ‘सूर्यकिरण’ एअर शो आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार हे निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पक्षात महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे.
नांदुरी ते सप्तशृंगी गड या घाटमार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने दोन्ही दिशांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे.
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ, बहुसदस्य प्रभाग पद्धत, चार मतांची प्रक्रिया, मोबाईल बंदी, मतपत्रिकांचे रंग आणि आवश्यक ओळखपत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्या दिवशी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने १३ प्रकारची ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. मतदारांनी योग्य ओळखपत्रासह मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. शहरात १,५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार असून ती पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त असतील.
मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.