नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वाहतूक नियमभंगांवर CCTVच्या आधारे ई-चलन तयार करण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील १,१३२ कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले असून २० फेब्रुवारीपासून प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल व विस्तारीकरण प्रकल्पामुळे नाशिकची प्रवासी क्षमता, उद्योग, निर्यात आणि आगामी कुंभमेळ्याची तयारी अधिक मजबूत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष मोहिमेत बालकामगार व भिक्षेकरी मुलांची सुटका करत ५४ बालकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला असून, बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात २२ व २३ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा ‘सूर्यकिरण’ एअर शो आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ७२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार हे निश्चित झाले असून आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पक्षात महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचना.
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ, बहुसदस्य प्रभाग पद्धत, चार मतांची प्रक्रिया, मोबाईल बंदी, मतपत्रिकांचे रंग आणि आवश्यक ओळखपत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्या दिवशी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.
मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने १३ प्रकारची ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. मतदारांनी योग्य ओळखपत्रासह मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.