के.के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय ‘प्र-ज्ञान’ विज्ञान प्रदर्शन ११-१२ डिसेंबरला

नाशिकच्या के.के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये ११ आणि १२ डिसेंबरला ‘प्र-ज्ञान’ या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन असून, राज्यातील ७५० विद्यार्थी व २०० प्रकल्प यात सहभागी होणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा 2027: भाविकांसाठी तात्काळ आरोग्यसेवेचे मजबूत नियोजन

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना त्वरित आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे.

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासाला चालना; राज्य सरकारकडून ५० कोटी रुपये निधी जारी

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील विकासकामांना वेग देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित केला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

नाशिकमध्ये बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत नोकरी सहाय्य केंद्र सुरू

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकने युवकांना मोफत मार्गदर्शन व तत्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना केली आहे. दहावीपासून पदवीपर्यंतच्या उमेदवारांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

नाशिकमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 60 हजारांचा माल जप्त

नाशिक गुन्हे शाखा युनिट-1 ने टाकळी रोड परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विकणाऱ्या युवकाला अटक करून 60 हजार रुपयांचा माल जप्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

नाशिकमध्ये नव्या ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींची योजना मंजूर; वर्ल्ड बँक ७० कोटी कर्ज देण्यास तयार

अमृत-2 योजनेंतर्गत नाशिकमध्ये नवीन ड्रेनेज लाईनसाठी २२७ कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मंजुरी मिळाली आहे. निधीअभावी मनपाने केलेल्या विनंतीनंतर वर्ल्ड बँकेने ७० कोटी कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे.

आता घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बदला: UIDAI चा नवीन आधार अॅप लॉन्च, OTP व फेस ऑथेंटिकेशनद्वारे अपडेट

तुम्ही आता घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर सहजतेने बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन “Aadhaar Mera Aadhaar Meri Pehchaan” अॅप लॉन्च केले असून, यात मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. लवकरच या अॅपमधून पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. UIDAI नुसार ही डिजिटल … Read more

पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक रेल्वेमार्ग अंतिम; लोकसभेत रेल्वेमंत्र्यांची घोषणा

बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत लोकसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा अंतिम मार्ग आता ‘पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक’ असा निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आता प्रत्यक्षात पुढे जाणार आहे. मूळ आराखड्यानुसार रेल्वेमार्ग थेट पुणे–नाशिक असा ठरवण्यात आला होता. मात्र, जुन्‍नर तालुक्यातील खोडद येथे … Read more

नाशिकमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी; दत्त जन्मोत्सवासाठी भक्तांची मोठी गर्दी

नाशिक शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी (दि. ४) दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात अखंड श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा समारोप होता. दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे … Read more

नाशिकची सुरक्षा भक्कम: फिनलँडहून खरेदी केलेली ९० मीटर अग्निशमन शिडी जानेवारीत दाखल

गगनचुंबी इमारतींच्या वाढत्या प्रमाणामुळे नाशिक महापालिकेने फिनलँडहून ९० मीटर उंचीची शिडी खरेदी केली असून ती जानेवारीत शहरात दाखल होणार आहे.