आयमा इंडेक्स 2025 औद्योगिक महाकुंभाचे आज भव्य उद्घाटन; 350 स्टॉल्स, ड्रोन शो आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आकर्षण

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयमा इंडेक्स 2025 या चार दिवसीय भव्य औद्योगिक महाकुंभाचे आज, 28 नोव्हेंबर रोजी उद्घाटन होत आहे. आयमा इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे आयोजित या औद्योगिक महोत्सवाला उद्योग क्षेत्राकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाचे चेअरमन वरुण तलवार आणि अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योजक आणि नागरिकांनी वाढत्या संख्येने उपस्थित राहून या मेगा एक्स्पोला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.


उद्घाटन सोहळ्यात ख्यातनाम मान्यवर उपस्थित

या महाकुंभाचे उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त डॉ. अनिल सुकलाल, उद्योग खात्याचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, उद्योग आयुक्त (विकास) दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि दीपक बिल्डर्सचे अध्यक्ष दीपक चंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.


350 आधुनिक स्टॉल्स, ड्रोन शो आणि एआय तंत्रज्ञानाचे आकर्षण

या प्रदर्शनात 350 पर्यावरणपूरक, वातानुकूलित स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप उत्पादने, इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी स्वतंत्र विभाग आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला भव्य ड्रोन शो हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.


आजचे कार्यक्रम

  • दुपारी 2 वाजतानावीन्यता आणि व्यापाराच्या संधी या विषयावरील चर्चासत्र
    • मार्गदर्शन : ऋषभ इन्स्ट्रमेंट्सचे नरेंद्र गोलिया
  • दुपारी 3 वाजता – सोमालियाहून आलेल्या लेसोथो प्रतिनिधी मंडळाशी संवाद

उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट मार्गदर्शन

प्रदर्शनादरम्यान चारही दिवस विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना, स्टार्टअप्सला आणि नवोदित व्यवसायांना मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना काळात उद्योगांवर आलेल्या संकटांवर चर्चा करून उपाययोजना ठरवण्याचा प्रयत्नही आयमा करत आहे.


माझगाव डॉक (MDL) चा विशेष सहभाग

या औद्योगिक मेळाव्याची खास वैशिष्ट्य म्हणजे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांचा सहभाग.
रविवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी

  • एमडीएलचे महाव्यवस्थापक हरेराम सिंग
  • मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय सावंत

हे विक्रेते, पुरवठादार आणि भागधारकांना मार्गदर्शन व सादरीकरण करणार आहेत.

एमडीएल ही भारतातील अग्रगण्य जहाजबांधणी व पाणबुडी निर्मिती संस्था असून त्यांच्या पुरवठा साखळीत असेंब्ली, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक घटक, यांत्रिक प्रणाली, यंत्रसामग्री, पाइपिंग आणि इतर उपयुक्त सेवा यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


प्रदर्शनासाठी सक्षम कार्यकारिणीचा पुढाकार

या महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, डीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयपीपी निखिल पांचाळ, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, कोषाध्यक्ष गोविंद झा आणि सर्व कार्यकारिणी सदस्य परिश्रम घेत आहेत.