नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही … Read more

तापमानात मोठी घसरण होण्याचा हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला … Read more

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे पुनर्विवाह इच्छुकांसाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

नवचेतना अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या एकल महिलां व पुरुषांसाठी मोफत सर्व जातींचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नाशिक कुंभमेळा 2027 : साधुग्राम रचनेत बदलाची शक्यता; वृक्षतोडीविरोधातील आंदोलनानंतर पालिकेची माघार

आगामी नाशिक कुंभमेळा 2027 च्या नियोजनात महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या साधुग्राम क्षेत्रातील रचना आणि तयारी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. साधुग्राम परिसरात कुंभमेळा नियोजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले होते. या जनक्षोभानंतर नाशिक महानगरपालिकेने तात्पुरती माघार घेत साधुग्राम रचनेत बदल करण्याचा विचार सुरू केला आहे. … Read more

आयमा इंडेक्स 2025 औद्योगिक महाकुंभाचे आज भव्य उद्घाटन; 350 स्टॉल्स, ड्रोन शो आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आकर्षण

नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयमा इंडेक्स 2025 या चार दिवसीय भव्य औद्योगिक महाकुंभाचे आज, 28 नोव्हेंबर रोजी उद्घाटन होत आहे. आयमा इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे आयोजित या औद्योगिक महोत्सवाला उद्योग क्षेत्राकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचे चेअरमन वरुण तलवार आणि अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योजक आणि नागरिकांनी वाढत्या संख्येने उपस्थित राहून या मेगा एक्स्पोला … Read more

नाशिक विमानतळाचा विस्तार मान्य, प्रवासी क्षमता होणार 1000

दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडला नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधण्यास मान्यता मिळाली. यासोबत प्रांगण, अ‍ॅप्रन, पार्किंग आणि परिसर विकास यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विस्तारानंतर 25,000 चौरस मीटर पार्किंग क्षेत्र उपलब्ध होईल. प्रवाशांसाठी बोर्डिंग, एरो ब्रीज, स्कॅनर आणि इतर आधुनिक सुविधा मिळतील. सध्या ताशी 300 प्रवासी येथे प्रवास करतात, विस्तारानंतर ही … Read more