नाशिक महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनची खूण केली जाणार आहे.
नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हेशाखा युनिट २ ने अटक केली असून ६६ गट्टू व ७ चक्री असा सुमारे ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षसंवर्धन आंदोलनाला २७ दिवस पूर्ण झाले असतानाही सोमवारी आंदोलनस्थळी अनपेक्षित शांतता दिसून आली. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर अचानक कमी उपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साधुग्राम परिसरातील झाडतोड अपरिहार्य असून, त्याऐवजी १५ हजार झाडांची लागवड केली जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
नाशिक सह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्याचा धान्यसाठा न मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४०० दुकानदारांचे धान्यवाटप अडथळ्यात आले आहे. वाहतुकीत झालेल्या उशिरामुळे कार्डधारकांनाही मोठी गैरसोय होत आहे.
नाशिक शहर सायबर पोलीसांनी फर्जी लोन कॉल सेंटर चालवून नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे.