सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण; लोगो स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे अनावरण करण्यात आले. लोगो स्पर्धेत देशभरातून हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला असून उत्कृष्ट डिझाइन सादर करणाऱ्या विजेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.