त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासाला चालना; राज्य सरकारकडून ५० कोटी रुपये निधी जारी December 10, 2025 by nashikinfo.in त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील विकासकामांना वेग देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित केला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.