नाशिक विमानतळाचा विस्तार मान्य, प्रवासी क्षमता होणार 1000

दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडला नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधण्यास मान्यता मिळाली. यासोबत प्रांगण, अ‍ॅप्रन, पार्किंग आणि परिसर विकास यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विस्तारानंतर 25,000 चौरस मीटर पार्किंग क्षेत्र उपलब्ध होईल. प्रवाशांसाठी बोर्डिंग, एरो ब्रीज, स्कॅनर आणि इतर आधुनिक सुविधा मिळतील. सध्या ताशी 300 प्रवासी येथे प्रवास करतात, विस्तारानंतर ही क्षमता ताशी 1000 प्रवाशांपर्यंत वाढेल. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल आणि रोजगारनिर्मितीमध्ये मदत होईल.

विस्तारासाठी अंदाजे 556 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासन आणि एचएएल यांच्यात लवकरच करार होणार आहे. बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त, पोलिस आयुक्त, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.