नरेडको नाशिक होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५: घरखरेदी आणि गुंतवणुकीची सुवर्णसंधी

नाशिकमध्ये होणारे नरेडको होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ चार दिवस घर, प्लॉट आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरणार आहे.

सिंहस्थासाठी साधुग्राममधील झाडतोड अपरिहार्य, बदल्यात १५ हजार झाडांची लागवड – मंत्री गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी साधुग्राम परिसरातील झाडतोड अपरिहार्य असून, त्याऐवजी १५ हजार झाडांची लागवड केली जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला, तीन दिवसांत तापमानात ४.३ अंशांची घसरण

नाशिक जिल्ह्यात पुन्हा कडाक्याची थंडी परतली असून तीन दिवसांत किमान तापमानात ४.३ अंशांची लक्षणीय घसरण झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा 2027: भाविकांसाठी तात्काळ आरोग्यसेवेचे मजबूत नियोजन

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना त्वरित आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे.

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकासाला चालना; राज्य सरकारकडून ५० कोटी रुपये निधी जारी

त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील विकासकामांना वेग देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित केला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक रेल्वेमार्ग अंतिम; लोकसभेत रेल्वेमंत्र्यांची घोषणा

बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत लोकसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा अंतिम मार्ग आता ‘पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक’ असा निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आता प्रत्यक्षात पुढे जाणार आहे. मूळ आराखड्यानुसार रेल्वेमार्ग थेट पुणे–नाशिक असा ठरवण्यात आला होता. मात्र, जुन्‍नर तालुक्यातील खोडद येथे … Read more

नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही … Read more

सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाला वेग; NTPC–महागेंकोचा संयुक्त प्रस्ताव NCLT कडून मंजूर

NCLT ने NTPC आणि महागेंको यांच्या संयुक्त प्रस्तावाला मान्यता दिल्याने 1,350 मेगावॅट क्षमतेचा सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून रोजगार आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

तापमानात मोठी घसरण होण्याचा हवामान विभागाचा इशारा

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला … Read more

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे पुनर्विवाह इच्छुकांसाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

नवचेतना अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या एकल महिलां व पुरुषांसाठी मोफत सर्व जातींचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.