Nashik City
नाशिकमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी; दत्त जन्मोत्सवासाठी भक्तांची मोठी गर्दी
नाशिक शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी (दि. ४) दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात अखंड श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा समारोप होता. दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे … Read more
नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही … Read more
तापमानात मोठी घसरण होण्याचा हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला … Read more