मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाने १३ प्रकारची ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. मतदारांनी योग्य ओळखपत्रासह मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘वोटकर नाशिककर’ ही जनजागृती मोहीम राबवली जात असून मनपा प्रशासन व पोलिसांकडून नागरिकांना निर्भय व पारदर्शक वातावरणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.