नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘वोटकर नाशिककर’ ही जनजागृती मोहीम राबवली जात असून मनपा प्रशासन व पोलिसांकडून नागरिकांना निर्भय व पारदर्शक वातावरणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनची खूण केली जाणार आहे.