मकर संक्रांती पतंगोत्सव : वीजवाहिन्यांपासून दूर राहा, नायलॉन मांजा टाळा – महावितरणचे नागरिकांना आवाहन

मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.