नाशिक शहरात २२ व २३ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा ‘सूर्यकिरण’ एअर शो आयोजित करण्यात आला असून, नाशिककरांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून २३ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर धरण परिसरात भव्य एअर शो होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने सखोल नियोजनाचे आदेश दिले आहेत.
नाशिक पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने २३ जानेवारी रोजी गंगापूर धरण परिसरात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण ऍरोबॅटिक टीमचा भव्य एअर शो होणार असून सुमारे ३३ हजार नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.