नाशिकमध्ये नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणारा तरुण अटकेत; ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त December 16, 2025 by nashikinfo.in नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हेशाखा युनिट २ ने अटक केली असून ६६ गट्टू व ७ चक्री असा सुमारे ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.