मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हेशाखा युनिट २ ने अटक केली असून ६६ गट्टू व ७ चक्री असा सुमारे ७०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.