नाशिक स्मार्ट सिटीमध्ये CCTV आधारित ई-चलन प्रणाली सज्ज; १५ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वाहतूक नियमभंगांवर CCTVच्या आधारे ई-चलन तयार करण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील १,१३२ कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले असून २० फेब्रुवारीपासून प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.