आता घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बदला: UIDAI चा नवीन आधार अॅप लॉन्च, OTP व फेस ऑथेंटिकेशनद्वारे अपडेट
तुम्ही आता घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर सहजतेने बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन “Aadhaar Mera Aadhaar Meri Pehchaan” अॅप लॉन्च केले असून, यात मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. लवकरच या अॅपमधून पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. UIDAI नुसार ही डिजिटल … Read more
पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक रेल्वेमार्ग अंतिम; लोकसभेत रेल्वेमंत्र्यांची घोषणा
बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत लोकसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा अंतिम मार्ग आता ‘पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक’ असा निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आता प्रत्यक्षात पुढे जाणार आहे. मूळ आराखड्यानुसार रेल्वेमार्ग थेट पुणे–नाशिक असा ठरवण्यात आला होता. मात्र, जुन्नर तालुक्यातील खोडद येथे … Read more
नाशिकमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी; दत्त जन्मोत्सवासाठी भक्तांची मोठी गर्दी
नाशिक शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी (दि. ४) दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात अखंड श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा समारोप होता. दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे … Read more
डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता; महसूलमंत्री बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रातील महसूल विभागात डिजिटल क्रांतीचा आणखी एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. राज्य सरकारने डिजिटल सातबारा (7/12), 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना अखेर अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करून हे उतारे आता पूर्णपणे वैध मानण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकात असे स्पष्ट करण्यात आले आहे … Read more
नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही … Read more