नरेडको नाशिक होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५: घरखरेदी आणि गुंतवणुकीची सुवर्णसंधी

नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठा उपक्रम असलेल्या नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५चे उद्घाटन गुरुवारी (१८ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. डोंगरे वसतिगृह मैदानावर उभारण्यात आलेले आकर्षक डोम्स, प्रशस्त स्टॉल्स आणि नामांकित बांधकाम व्यावसायिकांची उपस्थिती यामुळे या प्रदर्शनाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलद शर्मा आणि बीएसएनएलचे महाप्रबंधक सारंग मांडवीकर यांच्या हस्ते होणार आहे.

१८ ते २१ डिसेंबर या कालावधीत चार दिवस चालणारे हे प्रदर्शन सकाळी १० वाजल्यापासून नाशिककरांसाठी खुले राहणार आहे. घर खरेदी, प्लॉट गुंतवणूक, व्यावसायिक मालमत्ता तसेच रिअल इस्टेटमधील नवीन ट्रेंड्सची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.

या एक्स्पोमध्ये ४.९९ टक्के गृहकर्ज दरासारख्या विशेष ऑफर्स, तसेच ऑन-द-स्पॉट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी चांदीचे नाणे भेट देण्यात येणार असून ही आकर्षणे नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी सांगितले की, घर आणि प्लॉटमधील गुंतवणूक दीर्घकालीन व सुरक्षित परतावा देत असल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा कल सातत्याने वाढत आहे.

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हे नाशिककरांसाठी घर खरेदीची उत्तम संधी, विश्वासार्ह गुंतवणूक मंच आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.