मान्सूनची पाठ : जलसंकट अधिक गडद; गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – १५ जून सरल्यानंतरही मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील जलस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील प्रमुख चोवीस धरणांपैकी निम्मी धरणे कोरडीठाक पडली आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे जलसंकट अधिक गडद बनले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा शिल्लक आहे. देशात यंदा वेळेआधी मान्सूनने वर्दी दिली. …

Continue Reading मान्सूनची पाठ : जलसंकट अधिक गडद; गंगापूरमध्ये १८ टक्केच साठा

नाशिककरांवरील जलसंकट गडद; जेमतेम ५४८ दशलक्ष घनफुट शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – १५ जूनची तारीख उलटली तरी अद्यापही त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच मुकणे व दारणा धरणातील जलपातळी वाढू शकलेली नाही. गंगापूर आणि मुकणे धरणात महापालिकेसाठी जेमतेम ५४८ दशलक्ष घनफुट इतकेच पाणीआरक्षण शिल्लक राहिले असून, ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १९ दिवसांचा …

Continue Reading नाशिककरांवरील जलसंकट गडद; जेमतेम ५४८ दशलक्ष घनफुट शिल्लक

नाशिकरांवर जलसंकट; जिल्ह्यात केवळ ८.९३ टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील लहान – मोठ्या प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने कमी हाेत पाणीसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. जिल्ह्यातील २४ धरणांची पाणीपातळी जोत्याखाली गेली असून, सात धरण कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. वेळेत वरुणराजाची कृपा झाल्यास हे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे. सलग दोन – तीन वर्षांच्या आबादाणीला गेल्या वर्षी …

Continue Reading नाशिकरांवर जलसंकट; जिल्ह्यात केवळ ८.९३ टक्के जलसाठा

जलसाठा घटतोय! गंगापूर धरणाची जलपातळी खालावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापालिकेकडून शहरात पाणीकपातीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणांत नाशिककरांसाठी जेमतेम १,०९१ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणीसाठा शिल्लक राहिला असून, तो ३१ जुलैअखेरपर्यंत पुरविण्यासाठी दररोज सुमारे २५ टक्के पाणीकपात करावी लागणार असल्याने नाशिककरांवरील पाणीकपात अटळ झाली आहे. गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे …

Continue Reading जलसाठा घटतोय! गंगापूर धरणाची जलपातळी खालावली

गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचे फेरनियोजन करावे. गंगापूर एेवजी दारणा धरणातून अतिरीक्त ०.५ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा खात्याचे प्रधान …

The post गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे