संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सनई चौघडे, टाळ मृदुंग अन् विठू नामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, ‘एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..’ हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या …

Continue Reading संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढीसाठी गाव ते थेट पंढरपूर बससेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आषाढी यात्रेसाठी नाशिकमधून पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिकमधील विविध आगारातून ३५० बसेस सोडण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या गावातून ४० पेक्षा जास्त भाविक एकत्रित मागणी करतील, त्यांना थेट गाव ते पंढरपूर अशी बस सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे भाविकांची प्रवासाची दगदग टळणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठुनामाचा जयघोष करीत …

Continue Reading आषाढीसाठी गाव ते थेट पंढरपूर बससेवा

मुख्यमंत्र्यांच्या घोषनेनंतर अनुदानाच्या आदेशाची दिंड्यांना प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंढरपूरच्या आषाढ वारीसाठी राज्यभरातून निघणाऱ्या नोंदणीकृत पायी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पण हे अनुदान कधी हाती पडणार याबाबतचे शासनस्तरावरून आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे अनुदानावरून दिंडीप्रमुखांमध्ये संभ्रमावस्था आहे. राज्यात नोंदणीकृत दीड हजार दिंड्या. संत निवृत्तिनाथ महाराज पायी वारीत ५१ दिंड्यांचा सहभाग. राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी …

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या घोषनेनंतर अनुदानाच्या आदेशाची दिंड्यांना प्रतीक्षा