तुम्ही आता घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर सहजतेने बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन “Aadhaar Mera Aadhaar Meri Pehchaan” अॅप लॉन्च केले असून, यात मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. लवकरच या अॅपमधून पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे.
UIDAI नुसार ही डिजिटल सेवा दुर्गम भागात राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि स्थलांतरितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आधार अपडेटसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; फक्त ओटीपी आणि फेस ऑथेंटिकेशन वापरून प्रक्रिया पूर्ण करता येते.
नवीन आधार अॅप वापरण्याची प्रक्रिया:
- आधार अॅप डाउनलोड करा
- लॉगिनसाठी आधार क्रमांक टाका
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल
- 6 अंकी लॉगिन पिन सेट करा
- “माझा आधार अपडेट करा” पर्याय निवडा
- मोबाईल नंबर अपडेट पर्यायावर क्लिक करा
- नवीन नंबर टाकून ओटीपी व फेस ऑथेंटिकेशन करा
नवीन आधार अॅपची वैशिष्ट्ये:
- ई-आधार नेहमी सोबत, कागदी प्रत नेण्याची गरज नाही
- फेस स्कॅन आधारित सुरक्षित प्रमाणीकरण
- हॉटेल चेक-इन, सिम अॅक्टिव्हेशन, बँक KYC अधिक वेगवान
- कुटुंब व्यवस्थापन सुलभ: सर्वांची माहिती एका फोनवर
- निवडक डेटा शेअरिंगची सुविधा, गोपनीयता सुरक्षित
मोबाईल नंबर अपडेट का आवश्यक?
आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा असून 1.3 अब्जांहून अधिक लोकांचा डेटा यात संग्रहित आहे. मोबाईल नंबर हा आधारचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण तो:
- बँक खाते लॉगिन
- सरकारी योजना / अनुदाने
- आयकर पडताळणी
- डिजीलॉकर आणि इतर डिजिटल सुविधांसाठी
महत्त्वपूर्ण असतो. जुना किंवा बंद झालेला मोबाईल नंबर अनेक सेवांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे UIDAI ने ही सुविधा पूर्णपणे डिजिटल करून अधिक सोयीची बनवली आहे.