नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपत आली आहे. आज आणि उद्या हे अर्ज भरण्याचे अंतिम दोन दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
राजकीय आघाड्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका देखील अद्याप स्पष्ट झालेली नाही.
भाजपाने यावेळी “१०० प्लस” जागांचा नारा दिला आहे. सुरुवातीला हा महायुतीचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आता भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजून एकाही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही यादी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जर युती ठरली नाही, तर भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकते, त्यामुळे नाशिक महापालिका निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.