नाशिक जिल्हा परिषदेतर्फे पुनर्विवाह इच्छुकांसाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

नाशिक— नवचेतना अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या एकल महिलां व पुरुषांसाठी मोफत सर्व जातींचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील एकल व्यक्तींना नवीन आयुष्याची संधी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

मेळाव्याची तारीख व वेळ

  • रविवार, 14 डिसेंबर 2025
  • दुपारी 12 ते 4

मेळाव्याचे ठिकाण

  • जिल्हा परिषद सभागृह, नाशिक
  • ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड

आयोजक

  • सर्व अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद नाशिक

विशेष – जिल्हा परिषद आकर्षक योजना

विधवा महिला किंवा विधवा महिलेशी लग्न करणारा वर यापैकी एकजाण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असावा. मेळाव्यातून ज्यांचे लग्न जमेल त्यांचे लग्न जि. प. मार्फत मोफत लावून दिले जाईल. तसेच त्या विधवा महिलांच्या अपत्यना एक लाख रुपयांचे बचत पत्र fd करून देण्यात येईल. (नियम व अति लागू)

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या झेरॉक्स
  2. मृत्यू प्रमाणपत्र (विधवा असल्यास)
  3. घटस्फोट प्रमाणपत्र (असल्यास)
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. वय, राहणीमान, कौटुंबिक माहिती संबंधित कागदपत्रे

नोंदणीसाठी संपर्क क्रमांक

  • 8453902222 / 7447785910

सहकार्य

  • साऊ एकल महिला समिती
  • जगदंब फाउंडेशन

हा उपक्रम एकल व्यक्तींना सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने नवीन सहजीवनाची संधी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या वेळेत मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.