शिक्षक निवडणुकीतील प्रमुख उमेदवार करोडपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. या उमेदवाराला विद्यमान आमदार दराडेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय गाजला आहे. अद्याप तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नसला तरी, उमेदवारांनी संपत्तीचे विवरण सादर केले आहे. त्यामध्ये अनेक प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत, तर अपक्ष दराडे हे लखपती असल्याचे समोर आले आहे.

अपक्ष उमेदवार किशोर दराडे दहावी पास

संपत्तीच्या विवरणानुसार, अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे मजूर असून, ते दहावी पास आहेत. त्यांच्याकडे २ लाख २६ हजार रुपये, यामध्ये ५३ हजार रुपयांची गाडी, सव्वा लाख रुपयांचा विमा आणि त्यांच्या पत्नीकडे १ लाख ३९ हजार रुपये, यामध्ये १ लाख ३० हजार रुपये किमतीचे २ तोळे सोने अशी संपत्ती आहे.

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे हे शेती व वकिली व्यवसायिक आहेत. त्यांची संपत्ती ३५ कोटी असून, सर्व उमेदवारांमध्ये ते श्रीमंत उमेदवार असल्याचे समोर आले आहे. सहकार विभागाने त्यांच्या नावावर दाखल केलेला ७ कोटींचा दावा प्रलंबित असल्याची माहिती त्यांच्या शपथपत्रात आहे. सौ. गुळवे यांच्या नावावर २ कोटी ८५ लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर १ कोटी १९ लाख ७ हजार ३८६ रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे १ लाख रुपयाचे कर्ज असून, मुलाच्या नावावरही १२ लाख २० हजार रुपयांचे कर्ज आहे. ४ कोटी २४ लाख ७७ हजार २६ रुपयांची जंगम, तर ३५ कोटी २४ लाख २५ हजारांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. इगतपुरी येथे विविध भागांत त्यांची शेती असून, त्यांच्याकडे दहा तोळे म्हणजेच ६ लाख ५० हजारांचे, तर त्यांच्या पलीकडे ९ लाख ५० हजार रुपयांचे १५ तोळे सोने आहे. तीन चारचाकी गाड्यांसह तीन दुचाकी गाड्या यांच्या कुटुंबाच्या नावे आहेत.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांचा प्रमुख व्यवसाय व्यवसाय शेती असून, इतर व्यवसायाशीही ते जोडले गेले आहेत. सध्या ते १२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या पत्नीचे नावे ७ कोटी ७ लाख २७ हजार ६६२ रुपये इतकी संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे १८ कोटी ४९ लाख १२ हजार ८२९ रुपयांची, तर त्यांच्या पत्नीचे नावे ६ कोटी ११ लाख ४२ हजार ७९९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय विविध बँकांमधून त्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कमही ८ कोटी ७५ लाख ९९ हजार ११४ इतकी असून, त्यांच्या पत्नीचे नावे १ कोटी ५४ लाख २८ हजार ९ रुपये इतके कर्ज आहे.
आमदार किशोर दराडे कोट्याधीश

शिंदे गटाकडून उमेदवार असलेले विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पदवी घेतलेली असून, त्यांचा व्यापार आणि शेती हा मुख्य व्यवसाय आहे. दराडे यांची संपत्ती ८ कोटी ४३ लाख ६८ हजार ७६१ इतकी आहे, तर त्यांच्या पत्नी मीना दराडे यांच्या नावावर २ कोटी २३ लाख २८ हजार ३०० रुपयांची संपत्ती दाखवण्यात आलेली आहे. दराडे यांच्या नावावर २ कोटी २० लाख ५३ हजारांचे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ७० लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज आहे. ७४ लाख ३० हजार ५०० रुपये इतक्या किमतीची शेती, तर इतर ठिकाणी वाणिज्य वापराच्या इमारती त्यांच्या मालकीच्या आहेत. याशिवाय त्यांची इतर कंपन्यांमध्ये भागीदारीही आहे. पाच बँकांमध्ये त्यांनी ठेवी ठेवल्या असून, ३ लाख ३८ हजार ४०० रुपये इतके सोने त्यांच्याकडे आणि १३ लाख ८९ हजार ६०० रुपयांची सोने त्यांच्या पत्नीकडे आहे. शाळेमध्ये असलेली गुंतवणूक तसेच दोन स्कूल बस, एक जीप, एक चारचाकी, दोन दुचाकी त्यांच्याकडे आहेत. मुलगा शुभम दराडे यांच्यासह कुटुंबाच्या नावावरती जीवन विमा पॉलिसी आहेत.

अपक्ष विवेक कोल्हे सिव्हिल अभियंता

कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आणि भाजपचे युवा नेते असलेल्या विवेक कोल्हे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहे. सिव्हिल अभियंता असलेल्या विवेक कोल्हे यांची एकूण मालमत्ता सुमारे ९ कोटी ५० लाख इतकी आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता ८ कोटी ६३ लाख ९४ हजार १३८ रुपये, तर स्थावर मालमत्ता ९१ लाख ७४ हजार १८० इतकी आहे. त्यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांच्या नावे १७ लाख १७ हजार ७२१ रुपयांची जंगम मालमत्ता, तर ५ लाख ४० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ९४ लाख ३४ हजार ४५२ रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे. १०६ एकर जमिनीवर ते शेती करतात. त्यांच्याकडे ३८ लाख ६१ हजार ९४५ रुपयांचे ६२ तोळ्यांचे, तर त्यांच्या पत्नीकडे ११ लाख ६७ हजार ८७७ रुपयांचे ३५ तोळे येथे दागिने आहेत.

हेही वाचा: