नाशिक- कॉलेजरोडवरील कॅफेत एकास मारहाण

मारहाण

नाशिक : ‘माझ्याकडे काय बघतो’ अशी कुरापत काढून टोळक्याने १७ वर्षीय मुलास मारहाण करीत दुखापत केल्याची घटना काॅलेज रोडवरील एका कॅफेत घडली. अथर्व पाटील (१७, रा. कामटवाडा) याच्या फिर्यादीनुसार, टोळक्याने सोमवारी (दि.३) दुपारी अडीच वाजता काॅलेजरोडवरील कॉफी क्लब कॅफे येथे शिवीगाळ करीत मारहाण केली. यात अथर्व जखमी झाला आहे. टोळक्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉर्न वाजवण्याच्या कारणातून पिता-पुत्रास मारहाण

नाशिक : हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका कुटूंबाने पिता पुत्रास मारहाण केल्याची घटना पाथर्डी फाटा येथे घडली. जगदिश रामचंद्र चुंभळे (४१, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन पाटील यांच्यासह इतर तिघांनी रविवारी (दि.२) रात्री दहाच्या सुमारास कुरापत काढून मारहाण केली. यात जगदिश व त्यांचे वडिल जखमी झाले आहेत. इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल असून संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

राजीवनगरला घरफोडी

नाशिक : राजीव नगर येथील अश्वमेध कॉलनी येथे चोरट्याने घरफोडी करून ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. राहुल मोरे (३२) यांच्या फिर्यादीनुसार, ३ ते ४ जुन दरम्यान घरफोडी करून घरातील साेन्याचांदीचे दागिने, मुर्ती लंपास केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-